नवी दिल्ली । पाकिस्तानातील लोकांना आता स्वतःची कार खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा कठीण झाले आहे. देशात नवीन गाड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ARY न्यूजनुसार, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने सामान्यतः “मिनी-बजेट” म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केले. याअंतर्गत कारवरील कर 100% वाढवण्यात आला आहे.
रिपोर्ट्स नुसार, देशाच्या सिंध एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने वित्त (पूरक) कायदा 2022 द्वारे टॅक्सवरील टॅक्स वाढवला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांच्या टीकेनंतरही हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता 1001cc ते 2000cc इंजिन क्षमतेच्या कारवरील टॅक्स 2 लाख रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वी 1 लाख रुपये होता.
4 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल
आता 2001cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या कार मालकांना 4 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. असे मानले जात आहे की, हा निर्णय पाकिस्तानच्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे कंबरडे मोडेल. पाकिस्तानमधील एकूण विक्रीत या श्रेणीतील कारचा मोठा वाटा आहे. सामान्यतः, वाढीव किंवा कमी टॅक्ससह मागणी वाढण्याची आणि घटण्याची शक्यता जास्त असते.
देश अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे
पाकिस्तान सध्या प्रचंड कर्जात बुडाला असून देशातील महागाईही झपाट्याने वाढत आहे. याआधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही देशात वस्तू आणि इंधनाच्या किंमती वाढल्याने देशातील लोकांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागत असल्याची कबुली दिली होती.
विक्री 15 टक्क्यांनी कमी होईल
पाकिस्तानच्या इंडस मोटर कंपनीचे सीईओ अली असगर जमाली यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, “नवीन अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी टॅक्समध्ये काही बदल केले गेले तर त्याचा परिणाम स्थानिकरित्या असेंबल केलेल्या वाहनांच्या विक्रीत 10 -15 टक्के घसरण होऊ शकते.” यामुळे पाकिस्तान सरकारने स्थानिक उत्पादनाला चालना देण्याची आणि आयात वाहनांवरील टॅक्स वाढवण्याची शिफारस केली होती.