इटानगर ( अरुणाचल प्रदेश )|मानवी कौर्याचे भयानक वास्तव आज अरुणाचल प्रदेशात पाहण्यास मिळाले. अरुणाचल प्रदेशातील एका आमदाराच्या कुटुंबातील ११ सदस्यासह आमदाराची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांची हत्या झाल्याने संपूर्ण अरुणाचल प्रदेश हादरला आहे.
अरुणाचल प्रदेशातील तीराप येथे हि घटना घडली.अज्ञात हल्लेखोरांनी समूहाने येऊन कुटूंबावर हल्ला चढवला त्यात कुटुंबातील ११ सदस्य ठार झाले आहेत. तिरोंग ओबो असे त्या हत्या झालेल्या आमदाराचे नाव आहे. ते नॅशनल पीपल पार्टीचे आमदार आहेत. तसेच ते खोंसा पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सर्वप्रथम हल्ले खोरांनी आमदाराची हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची हत्या केली. या हत्याकांडात सुरक्षा रक्षक देखील मारला गेला आहे.
Shocked and anguished by the killing of MLA Tirong Aboh ji, his family & others in Arunachal Pradesh.
It is an outrageous attempt to disturb peace and normalcy in the North East. The perpetrators of this heinous crime will not be spared. My condolences to the bereaved families.
— Chowkidar Rajnath Singh (@rajnathsingh) May 21, 2019
हा हल्ला नागा बंडखोर संघटनेने केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एनएससीएन या संघटनेने हा हा हल्ला केला असल्याचे बोलले जाते आहे. या घटनेने संपूर्ण अरुणाचल प्रदेश हादरला असून मेघाल्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबत शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा हात्याकांडातील दोषींना कठोर शासन केले जाईल असे म्हणले आहे. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजूजू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.