धक्कादायक! ऑनलाईन शिकवणी समजत नसल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर । ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे स्वतःचे जीवन संपवलं आहे. गुरूवारी कुणीही नसल्याचे पाहून तरूणीने फॅनला साडीने गळफास लावून घेतला. गेले पाच-सहा दिवस तरूणी नैराश्यात होती, अशी माहिती पालकांनी दिली. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

ऐश्वर्या बाबासो बाटील असं या वीस वर्षीय तरूणीचं नाव आहे. करवीर तालुक्यातील वाशी या गावात ही तरूणी राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाईन शिक्षण तिला जमत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ती अस्वस्थ आणि निराश होती.

याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी तातडीने तरूणीला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”