सातारा जिल्ह्यात 70 नवे कोरोनाग्रस्त; दोन बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 54, 31, 43, 18, 10, 40, 62, 30, 50, 56 वर्षीय महिला, 21, 20, 22, 9, 35, 25 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील सातारा शहरातील बुधवार नाका येथील 43 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 30 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष, धनगरवाडी 26 वर्षीय महिला, उफळी येथील 55, 1 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय महिला, खावली येथील 29, 80 वर्षीय महिला, खिंडवाडी येथील 55 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, साईनगर मार्केट यार्ड येथील 48 वर्षीय महिला, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वसंतगड येथील 31 वर्षीय महिला, पोतले येथील 32 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 30 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 29 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, नांदगाव येथील 52 वर्षीय महिला, सैदापुर येथील 76, 40, 20 वर्षीय महिला, पेरले येथील 16, 20 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील पिंपरी बु. येथील 21 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60, 43 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील 58, 37 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला, विखले येथील 50 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 47, 25, 75, 12, 19, 24, 48 वर्षीय पुरुष. 30, 45, 40, 24 वर्षीय महिला, भिलार येथील 68 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील मीरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, 31 आणि 13 वर्षीय महिला, नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला, तारळे 54, 45 वर्षीय महिला, कारळे येथील 48 वर्षीय पुरुष, नरळे येथील 50 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील 36 वर्षीय पुरुष.

दोन बाधितांचा मृत्यु
सातारा शहरामधील खाजगी हॉस्पिटल येथे तारळे ता. पाटण येथील 75 वर्षीय पुरुषाचा 15/07/2020 रोजी उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. कोरोना संशयित म्हणुन त्याचा उपचार करतेवेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले आहे.

तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बुधवार नाका सातारा येथील 93 वर्षीय पुरुषाचा 16/07/2020 रोजी उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. कोरोन संशयित म्हणुन त्याचा उपचार करतेवेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाले. श्वसन संस्थेचा तीव्र संसर्ग झाल्याचे लक्षणे असल्याने या दोघांवरती उपचार सुरु होते, अशी माहिती डाॅ. गडीकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.