नेटमध्ये सराव करतेवेळी 24 वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
46
Bat Ball
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन : वृत्तसंस्था – नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या क्रिकेटपटूचे नाव जोशुआ डाऊनी असे आहे. जोशुआ डाऊनीच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

काय घडले नेमके
जोशुआ डाऊनी हा नेटमध्ये सराव करत होता. सराव करत असताना जोशुआ अचानक अडखळला आणि खाली कोसळला. यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ’24वर्षाच्या जोशुआ डाउनीच्या निधनाची बातमी ऐकून एनपीएलमधील प्रत्येकजण धक्क्यात आहे. या कठीण काळात आम्ही जोशुआच्या कुटुंबीयांसोबत आहोत. जोशुआच्या घरच्यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे असे नॉटिंगहॅमशायर क्रिकेट बोर्ड प्रीमियर लीगने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

या अगोदरसुद्धा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूला हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही खेळाडूंचा जीव वाचवण्यात यश आले तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here