धक्कादायक! रेशन दुकानावर धान्य आणायला गेल्यास महिलेला शरीरसुखाची मागणी; न्यायासाठी महिलेचे अमरण उपोषण

Fasting
Fasting
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | धान्य आणण्यासाठी राशन दुकानावर गेली असता तेथील राशन चालकाने महिलेला शरीरसुखाची मागणी करत दोन वेळेस विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी महिलेने आमरण उपोषणाला सोमवारी सुरुवात केली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अलकनंदा रामप्रसाद केंधळे (वय 35) केंधळे पोखरी, ता.मंठा, जि. जालना असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. गावातच गोविंदराव केंधळे यांचे राशन दु. नं.-171 आहे. सदर महिला या दुकानात राशन आणण्यासाठी गेले असता त्यांना राशन दिले नाही. तसेच दोन वेळा विनयभंगाचा प्रयत्न केला असल्याची माहिती अलकनंदा यांनी हॅलो महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे.

कोरोनासारख्या काळात राशन न मिळाल्यामुळे महिलेवर आणि त्यांच्या परिवाराला उपाशी राहण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.सदर घटनेबाबत महिलेने न्याय मिळवून द्यावा आणि स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून दुकानचालकाला निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी महिलेने केली आहे. नाहीतर न्याय मिळेपर्यंत अमरण उपोषण चालू ठेवणार असल्याची माहिती दिली.