धक्कादायक !!! सोनपापडी देण्याचे अमिष दाखवत पाथरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये बाल लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून सोनपापडी खाण्यास देण्याचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपीच्या पाथरी पोलिसांनी काही वेळातच मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी शहरामध्ये धक्कादायक आणि मानवी समाजाने शरमेने मान खाली घालावी असा प्रकार शुक्रवार 25 मार्च रोजी दुपारी 1 ते 1.30 वा सुमारास घडला आहे. शहरातील मुर्तुजा कॉलनीमध्ये राहणारा नराधम आरोपी दिलशाद हमीद बेग मिर्झा याने एका अल्पवयीन पिडीत मुलीस सोनपापडी खाण्यास देतो असा बहाणा करून स्वतःच्या घरामध्ये नेत वाईट हेतूने विनयभंग केला.

सदर घटना पीडित मुलीने घराकडे येऊन घाबरलेल्या अवस्थेत व रडत आईला सांगितल्यावर आरोपी विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक चावरे पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगलवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट दिली असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गांगलवाड करत आहे .