सातारा | खंडाळा तालुक्यातील रूई येथील काल शनिवारपासून बेपत्ता असलेल्या लहानग्या भावंडांचा मृतदेह आढळून आला आहे. तुकाईनगर -पाडेगाव परिसरात आज रविवारी दि. 29 रोजी सकाळी निरा उजव्या कालव्यात मृतदेह आढळले. पाेलिसांनी दाेघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
अंदोरी (ता. खंडाळा) नजीकच्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा मूलगा आशिष प्रशांत राणे (वय-4 वर्षे) आणि मुलगी ऐश्वर्या प्रशांत राणे (वय- अडीच वर्षे) हे दाेघे भाऊ बहीण शनिवारी दुपारी 12 वाजता शेवटचे पाहिले होते. नातेवाईकांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुले कुठेच आढळून आली नाहीत. अखेर शोधाशोध केल्यानंतर मुले कुठेच सापडत नसल्याने लोणंद पोलिसांना मुले बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांचे शाेध सुरु हाेता. पोलिसांनी तातडीने शाेधाशाेध सुरु केली परंतु काल शनिवारी रात्री पर्यंत बालक सापडली नाहीत.
आज (रविवार) सकाळी राणे कुटुंबियांच्या नजीक असलेल्या निरा उजव्या कालव्यात आशिषचा मृतदेह आढळला त्यानंतर त्याची बहीण ऐश्वर्या हिचा मृतदेह सोळस्कर वस्तीनजीक पोलिसांना आढळला. पोलिसांनी दाेघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या बालकांचा कशामुळे मृत्यू झाला याची तपास पोलिस करीत आहेत अशी माहिती सहाय्यक पाेलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली.