रशिया । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांमध्ये कोरोनाची लस विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात रशियाने कोरोना लस मिळाल्याची अधिकृत माहिती दिली होती. पण त्यातून एक अजून नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. हि लस रशियामध्ये श्रीमंत उद्योजकांना आणि राजकीय लोकांना केव्हाच मिळाली होती. या लसीचे डोस त्यांना देण्यात आले होते.
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना करोनाची लागण होऊ नये, म्हणून एप्रिल महिन्यातच प्रायोगिक टप्प्यावर असताना या लसीचे डोस देण्यात आल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. १२ जुलैला रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील करोना लसीच्या चाचण्या यशस्वी ठरल्याचा दावा केला.
रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे.या लसीवरील रशियातील कंपन्यांच्या अतिमहत्वाच्या अधिकाऱ्यांना तसेच उद्योगपती आणि सरकारी अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यातच व्हायरसपासून सुरक्षा देण्यासाठी या लसीचा डोस देण्यात आले होते. पुढच्या महिन्यापासून ही लस नागरीकांसाठी उपलब्ध होईल असे गेमली सेंटरचे संचालक अलेक्झांडर गिंटसबर्ग यांनी म्हटले आहे.
रशियात आतापर्यंत ७.७१ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे.तर तेथे १२ हजारांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लसीच्या क्लिनिकल चाचण्या रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.स्वयंसेवक कार्यक्रमातंर्गत रशियातील नामवंतांना लसीचे डोस देताना नियमांचे उल्लंघन झालेले नाही. हे कायदेशीर आहे. फक्त ती गुप्तता बाळगण्यात आली असे या संशोधनाशी संबंधित असलेल्यांनी सांगितले.ऑगस्ट महिन्यापर्यंत ही लस बाजारात उपलब्ध करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
रशियातील मॉस्को शहराला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे.सध्या अनेक देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले.सप्टेंबरपासून खासगी कंपन्या या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.