औरंगाबाद | कोरोना रुग्ण दर कमी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्या अनलॉक करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद होती. यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा एकदा पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असल्याने रविवारी अजिंठा लेणीत बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाचे चिंता वाढली आहे.
तालुका आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी यश आले असताना, अचानक 12 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये अजिंठा लेणीत काम करणारे मजूर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे तालुका आरोग्य विभागात धावपळ उडाली असून अजिंठ्याच्या लेणीवर सकारात्मक आढळलेल्या 12 रुग्णांपैकी 6 रुग्णांना तातडीने जरंडी केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
उर्वरित रुग्णांनाही रात्री उशिरापर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोना संसर्गाचीच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण घालण्यासाठी तालुक्यात कोरोना चालण्याचा वेग वाढवण्यात आलेला असून नियमित शंभरावर चाचण्या होत असून तपासणीसाठी नमुने औरंगाबादला पाठवण्यात येत आहेत.