व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, CCTV फुटेज आले समोर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला जोरदार धडक दिली आहे. हि धडक एवढी जोरदार होती कि मृत व्यक्ती दूरवर फेकला गेली. या अपघातात (Accident) त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर क-हावागज या ठिकाणी हा अपघात (Accident) घडला आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात (Accident) त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहन लष्करे असे या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत मोहन लष्करे बारामती मोरगाव रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा मोटरसायकलने त्यांना धडक दिली.

हि धडक एवढी जोरदार होती कि, मृत मोहन लष्करे हे तीस फुटापर्यंत उडून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी यामाहा चालकाला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं