धक्कादायक : महाबळेश्वरला सनसेटचे फोटो काढताना मुलगा दरीत कोसळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर येथे मावळत्या सूर्याचे (सनसेट) फोटो काढण्याची हाैस चांगलीच अंगलट आलेली आहे. महाबळेश्वर येथील प्रसिध्द असलेले नयनरम्य सनसेटचे छायाचित्र काढण्याचा मोह 14 वर्षीय मुलाला चांगलाच महागात पडला. फोटो काढण्याच्या नादात दरीत कोसळून अल्पवयीन मुलगा दुखापतग्रस्त झाला आहे. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या लॉडविक पॉईंटला ही धक्कादायक घटना घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर येथील लॉडविक पॉइंटवर फोटो काढताना 14 वर्षीय तरुण दरीत कोसळला. आदित्य जाधव असे त्या युवकाचे नाव आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. सनसेट दृश्याचे फोटो काढताना तोल जाऊन अचानक तो दरीत कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करून युवकाला बाहेर काढले. जखमी युवक अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक हौशी पर्यटक नको ते धाडसं करुन फोटोग्राफी करतात. मात्र पर्यटकांनी धोका पत्करुन अशी कुठलीही कृत्य करु नयेत, ज्यामुळे तुमच्या जीवावर बेतेल, असे आवाहन पोलीस आणि महाबळेश्वर पालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment