“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या गोष्टी केल्या जात आहेत. विरोधात बोलणाऱ्यांवर दडपशाहीसाठी केंद्र सरकार कडून ईडीचा वापर केला जात आहे हे दुर्दैवी,” अशी टीका सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांकडून ट्विटरच्या माध्यमाचा धमकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील नेते, मंत्री यांना नोटीस देण्याचे काम केले जात आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार असो किंवा इतर विरोधी पक्षातील नेता असो तो काही बोलल्यास त्याच्यावर त्या ठिकाणी चौकशी करीत ईडीच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. ईडीच्या अशा पद्धतीच्या प्रकाराबद्दल मी संसदेतही अनेकवेळा आवाज उठवला असल्याचे सुळे यांनी म्हंटले आहे. नवाब मलिक यांनी अनेक भाजपाच्या नेत्यांचे सत्य जनतेपुढे मांडत आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. नवाब मलिक या चौकशीला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment