सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
एखाद्या गोष्टीचा निषेध नोंदवायचा असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतो. मात्र चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील कोरेगांत तालुक्यात पहायला मिळाला आहे. काही वेळानंतर त्याच्या मागण्या पूर्ण झाल्यांनतर सदर इसमाने आपले आंदोलन मागे घेतलं खरं मात्र या घटनेने मात्र सर्वांचे लक्ष्य वेधले.
कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील संदीप जाधव या व्यक्तीने पाण्याचा टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. गावाचे सरपंच गावातील काही लोकांची अडवणूक करत असून जिल्हापरिषदे कडुन मिळणाऱ्या योजनांपासुन गावकऱ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप करत संदीप जाधव या व्यक्तीने हे आंदोलन आले. आंदोलनकर्त्याच्या काही मागण्या पूर्ण झाल्यानंतर लोकांनी समजूत काढून त्यांना या टाकी वरून खाली उतरवले आहे.
चक्क पाण्याचा टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन#Hellomaharashtra pic.twitter.com/O3grHUVdjw
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 29, 2022
याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. या विडिओ मध्ये आपण पाहू शकता की ही व्यक्ती ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या टाकीवर चढली आहे आणि मोठमोठ्याने घोषणाबाजी देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा, भारतीय संविधानाचा विजय असो अशी घोषणाबाजी सदर व्यक्ती देत होता. अखेर मागण्या पूर्ण होताच त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र या संपूर्ण प्रकारच्या मात्र उपस्थितांचे लक्ष्य वेधले.