हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन संक्रांतीच्या दिवशी आज औरंगाबाद (Aurangabad)मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले. औरंगाबाद शहरातील शहागंज भागातील कापड मार्केटला आग (Fire) लागली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
शहागंज परिसरात असलेल्या न्यू फॅशन होलसेल दुकानाच्या गोदामाला आज दुपारी ही आग लागली आहे. बघता बघता आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. त्यांनतर घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सात बंब तात्काळ दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पैलवान खाशाबा जाधवांची Google कडून दखल पण सरकारचं दुर्लक्ष; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
वाचा सविस्तर – 👇👇👇https://t.co/RxqGV7TpSA#Hellomaharashtra @YuvrajSambhaji
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 15, 2023
आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेने आसपासच्या दुकानदारांमध्ये घबराट उडाली.