दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पण, या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून होईल, याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही.

राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय घेणं कठिण आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल

Leave a Comment