हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. परंतु या पूर्वीच राज्यात श्रीराम शाकाहारी होते का मांसाहारी? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात आणखीन भर पडेल, असा एक निर्णय भिवंडीतील खारबांव ग्रामपंचायतने घेतला आहे. या ग्रामपंचायतीने, 22 जानेवारी रोजी गावातील मटन, चिकन, मच्छी तसेच देसी विदेशी मद्य विकण्यास मनाई आणली आहे.
इतकेच नव्हे तर, मटन चिकन मच्छी विक्री दुकाने, चायनीज दुकाने, मांसाहारी, हॉटेल ढाबा, मद्य दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त देण्यात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर देखील, खारबांव ग्रामपंचायतने जारी केलेल्या सूचना चर्चेचा भाग बनल्या आहेत. तसेच या सूचनांमुळे राज्यात नवीन वाद होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
https://www.facebook.com/100051009471894/posts/pfbid02z5zdgQbPQk4EAXFdJhKNNvW8mC2m9uvrXFGYnePuGiFZHoKovVC9hFiuELrgzGgnl/?app=fbl
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम हे शाकाहारी आहेत की मांसाहारी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. तसेच राम भक्तांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता राज्यामध्ये हा वाद शांत झाल्यानंतर 22 जानेवारी रोजी मांसाहारी पदार्थ विकण्यात येऊ नये, अशा सूचना खारबांव ग्रामपंचायतने दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी पत्रक देखील जाहीर केले आहे.
खारबांव ग्रामपंचायतने आपल्या पत्रकार म्हटले आहे की, सर्व मटण, चिकन, मच्छी व चायनीज विक्रेत्यांना तसेच मांसाहारी हॉटेल व धाबा मालकांना कळविण्यात येते की, श्री अयोध्येत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव 22 जानेवारी रोजी होणार असून आपल्या गावामध्ये श्रीराम मंदिर येथे मोठा उत्सव साजरा होणार आहे.
तरी गावात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन व मच्छी तसेच देशी व विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यासाठी बंदी केली आहे. आपण आपली मटण, चिकन, मच्छी विक्री दुकाने, चायनीज दुकाने, मासांहारी हॉटेल अथवा धाबा मद्य (दारू) दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरु न ठेवता संपूर्ण बंद ठेवावी. सर्व विक्रेत्यांनी दुकान धारकांनी ह्या सूचनेची दखल घेवून श्री राम उत्सव व ग्रा.प.ला सहकार्य करावे.