हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Corporate FD : सध्याच्या काळात व्याजदरात वाढ होत असल्याने जास्त रिटर्न मिळविण्यासाठी ग्राहक आता फिक्स्ड डिपॉझिट्सकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र, याची निवड करताना गुंतवणूकदारांनी फक्त ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी.
हे जाणून घ्या कि, बँकांप्रमाणेच, NBFC आणि काही कंपन्यांनासुद्धा ठराविक कालावधीसाठी व्याजदराने लोकांकडून डिपॉझिट्स गोळा करण्याची परवानगी आहे. ज्याला कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट्स असे म्हंटले जाते. बँकांप्रमाणेच यामध्ये देखील गॅरेंटर्ड रिटर्न दिला जातो. त्याचबरोबर कॉर्पोरेट एफडीवर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. मात्र अशा प्रकारची एफडी घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. Corporate FD
Corporate FD चे क्रेडिट रेटिंग
Corporate FD घेण्याआधी त्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग तपासणे महत्त्वाचे ठरेल. ज्या कंपन्यांचे रेटिंग चांगले आहे त्या कमी व्याजदर देतील मात्र इथे पैसे जास्त सुरक्षित राहतील. तसेच दुसरीकडे, ज्या कंपन्यांचे रेटिंग कमी आहे त्या जास्त रिटर्न देतील. ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडी जास्त सुरक्षित असतील मात्र कमी रिटर्न देतील. मात्र लोकांनी जास्त सुरक्षित असलेल्या एफडीमध्येच गुंतवणूक करावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
शॉर्ट टर्म एफडीची निवड करा
सध्या RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जात आहे. ज्यामुळे व्याजदरातही सातत्याने वाढ केली जाणार आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्मवाल्या एफडीवर लक्ष केंद्रित करणे चांगले ठरेल. जेणेकरुन ते लवकर मॅच्युर होतील आणि जास्त रिटर्न मिळण्यासाठी तीच रक्कम पुन्हा एकदा नफ्यासह FD मध्ये गुंतवता येईल. Corporate FD
FD वरील टॅक्स
हे लक्षात घ्या कि, FD वरील व्याजाला इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्यावर टॅक्स द्यावा लागतो. उदाहरणार्थ कॉर्पोरेट FD मधून एका वर्षात 5,000 रुपये जास्त रिटर्न मिळाल्यास, 10 टक्के TDS लावला जाईल. Corporate FD
डिपॉझिटमध्ये विविधता आणा
आपण वेगवेगळ्या बँका आणि कॉर्पोरेट्समधील वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे पैसे जास्त सुरक्षित राहतील. तसेच 180 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD मध्ये गुंतवणूक करता येऊ शकेल. त्याच वेळी, जर काही दिवसात पैशांची गरज असेल तर 15 दिवस किंवा 45 दिवसांच्या FD चा पर्याय देखील आहे. Corporate FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit/top-performing-company-fds.html
हे पण वाचा :
सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!