हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
करोना रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीने महाराष्ट्रावर हल्ला चढवला आहे. या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं आरोग्य यंत्रणेची एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई सुरु आहे. आजघडीला राज्यात म्युकरमायकोसिसचे 850 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे.पण रुग्णावाढीच्या तुलनेनं या इंजेक्शनचा तुटवडा आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिस पंधरवड्यापासून वेगाने पसरत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. त्यावर उपाय करण्यासाठी इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.