नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम आधीक तीव्र करण्यात आली आहे. मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुडावा निर्माण झाला आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील लसीचा तुटवाडा निर्माण झाल्याने मोहीम थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
ओडीशात 700 लसीकरण केंद्र बंद
कोरोनाच्या लसीच्या कमतरतेमुळे ओडिसा मधील 1400 पैकी 700 लसीकरण केंद्रे बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात केवळ दोनच दिवस पुरेल एवढा लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील करोना लसींचा साठा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लसीकरण बंद होईल की काय अशी भीती आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात लसीवरून राजकारण तापलं
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरणा वरून महाराष्ट्र राज्याला फटकारलं. त्यानंतर मात्र राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची टीका केली आहे. राज्यात केवळ साडेसात लाख लसींचा पुरवठा केला आहे. मात्र इतर राज्यांना चाळीस लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला 40 लाख डोस द्या त्यापेक्षा आधीक आमची काहीच मागणी नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page