कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जखिणवाडी, यांनी कराड तालुका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू गरीब तसेच कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक लाखाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते उपनिबंधक सहकारी संस्था, कराड मनोहर माळी यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक ऋणानुबंध जपल्याबद्दल कराड उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोहर माळी यांनी पतसंस्थेचे व श्री मळाई ग्रुपचे शेतीमित्र अशोकराव थोरात, पतसंस्थेच्या चेअरमन अरुणादेवी पाटील, सचिव सर्जेराव शिंदे यांचे कौतुक केले. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजू ,गरीब लोकांना मदत करण्यासाठी श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने एक लाख रुपयाचा धनादेश सुहास आनंदराव जाधव, अजित थोरात, आण्णासो काशीद, भरत जंत्रे, पोलीस पाटील प्रशांत गावडे, पतसंस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे, दत्तात्रय यादव, राजेंद्र येडगे, राजेंद्र पांढरपट्टे यांचे हस्ते नुकताच सुपूर्द करण्यात आला.
तसेच गेल्यावर्षी गोरगरीब लोकांना नागरी सहकारी पतसंस्थेने सहा लाखाची मदत केली यामध्ये एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली व समाजातील गरीब गरजू लोकांना पाच लाख रुपयांची साहित्य रुपाने मदत केली .यावर्षीही तोच आदर्श घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये तसेच काड सिद्धेश्वर महाराज यांचे कणेरी मठाला दहा हजार रुपये मदत दिलेली आहे.