हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मदुशनकाने हॅटट्रिक केली होती. दंडाधिकाऱ्यांनी या २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,’रविवारी त्याला पनाला शहरातून ताब्यात घेण्यात आले असता, त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हिरॉईन सापडली होती. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउन सुरु असताना जेव्हा मधुशनका गाडी चालवत जात होता तेव्हा त्यालापोलिसांकडून थांबविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याबरोबर गाडीत आणखीही एक व्यक्ती होती.
जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात मदुशनकाने हॅटट्रिक घेतली होती. यावर्षी याच संघाविरूद्ध त्याने दोन टी -२० चे सामनेही खेळले होते मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे तो अजूनपर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.