दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपूरात बुधवारी उशिरा रात्री ही कारवाई केली.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. काल (28 एप्रिल) रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. अखेर रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ ते दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

RFO दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर DFO विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.