हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड कडून बुधवारी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याज दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. ही कंपनी श्रीराम ग्रुपची उपकंपनी आहे. याबाबत श्रीराम सिटीने सांगितले की,”त्यांनी FD वरील व्याजदरामध्ये 25-50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.”
हे लक्षात घ्या कि, श्रीराम सिटी युनियन फायनान्स ही कंपनी लहान व्यवसाय आणि दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी फायनान्स पुरवते. 1 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. RBI कडून पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.4% केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. RBI कडून सलग तिसर्यांदा रेपो दर वाढवला गेला आहे. रेपो दर हा तो दर असतो ज्याद्वारे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज दिले जाते. FD Rates
आता कंपनीकडून 12 महिने आणि 36 महिन्यांच्या FD वर 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे तर 24 महिन्यांच्या कालावधीसाठी 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा केली गेली आहे. त्याच बरोबर 48 महिने आणि 60 महिन्यांच्या FD साठी व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. FD Rates
त्याच प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांनी ठेव किंवा नूतनीकरणाच्या तारखेला वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत) त्यांना वार्षिक 0.50% अतिरिक्त व्याज दिले जाईल,” असेही कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या निवेदनानुसार, मुदतपूर्ती झालेल्या डिपॉझिट्सच्या सर्व रिन्यूअलवर वार्षिक 0.25% अतिरिक्त व्याज दिले जाईल. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.shriramcity.in/fixed-deposit
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!
Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? ‘अशा’ पद्धतीने करा चेक
Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत
Yes Bank ने FD वरील व्याज दरात केली वाढ, नवे दर तपासा