बंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार? श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार याचे तर्कवितर्क आतापासूनच त्या-त्या मतदार संघातील नागरिक वर्तवू लागले आहेत. तर राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार ताकद लावत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये बंडखोरीचे प्रमाण ही तितकेच दिसले आहे. याचा कोणाला किती फायदा होणार हे येणाऱ्या निकालांवरून स्पष्ट होणार आहेर आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

आघाडीच्या जागावाटपात श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. मात्र हा निर्णय स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, डॉ. मोईज शेख आणि दानिश लांबे या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षातील बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते.

इतर काही बातम्या –

 

 

 

Leave a Comment