लेकीचे पत्र वाचून शुभांगी गोखले झाल्या भावुक; व्हिडीओ झाला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी आणली आहे. परिणामी बऱ्याच मालिकांचे शूटिंग इतर राज्यात सुरू आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. या मालिकेची सर्व टीम बायो बबलचे पालन करत आहेत. मदर्स डेच्या दिवशी सेटवर केक व एक भावनिक पत्र आले. हे पत्र मालिकेतील शकू म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लाडकी आणि एकुलती एक लेक सखी गोखलेने पाठवले होते. एकंदर हा प्रसंग आणि सखीचे पत्र आईच्या मनाला भिडणारा होता आणि तसेच झालं. पत्र वाचताना शुभांगी गोखले यांच्या डोळ्यात आपसूकचं पाणी तरळले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला.

https://www.instagram.com/p/COqgtO0ptwg/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्र सेटवर पाठवले होते. या पत्रात सखीने म्हटले की, अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद.

https://www.instagram.com/p/BsI7yvBhTAb/?utm_source=ig_web_copy_link

सखीचे हे पत्र वाचल्यानंतर तिची आई अर्थातच अभिनेत्री शुभांगी गोखले भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शुभांगी गोखलेंनी हे पत्र आणि सेलिब्रेशन चे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हि पोस्ट शेअर करताना त्यांनी सांगितले की सखीनी प्रॉडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. तीने एक गोड पत्र ही पाठवलं..युनिटमधल्या सगळ्या आयांसाठी.. त्यानंतर बायो बबलचा एक टीअर बबल झाला! आयांना मुलांच्या आठवणीनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं..सखी,या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं

Leave a Comment