कर्नाटक मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया, डिके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदावर राजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा तिढा आता सुटलेला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली असून डिके शिवकुमार याना उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 मे ला शपथविधी पार पडणार आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक आज (18 मे) सायंकाळी 7 वाजता बेंगळुरूमध्ये बोलावण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या केंद्रीय निरीक्षकांना CLP बैठकीसाठी बेंगळुरूला पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. याआधी बुधवारी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल आणि 72 तासांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल, असे सांगितले होते.

13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेस ने दणदणीत विजय मिळवत भाजपला अस्मान दाखवलं. परंतु काँग्रेस हायकमांड पुढे मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होता. अखेर पक्षाने पुन्ह एकदा सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. तर डिके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदासह अन्य महत्त्वाची खाती मिळतील.