पिंजऱ्यात मी.. तो मोकळा..! चांदेकरांच्या इमारतीत शेपटीवाल्यांची सभा; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अशी गोड जोडी आहे. नेहमी स्वतःचे फोटो शेअर करणारे हे दोघे यावेळी मात्र चक्क प्राण्यांचे फोटो शेअर करताना दिसले. होय..सिद्धार्थ आणि मिताली गोरेगाव पूर्व येथील म्हाडा कॉलनीत राहतात. यामुळे त्यांच्या इमारतीच्या मागेच आरेचे घनदाट जंगल लागते. दरम्यान अनेकदा या परिसरात जंगलातील प्राणी पहायला मिळतात. यावेळीही तसेच झाले. त्यांच्या घरातील खिडकीतून त्यांना चक्क शेपटीवाल्या प्राण्यांचे दर्शन घडले.

https://www.instagram.com/p/CQIxTu_njcu/?utm_source=ig_web_copy_link

सर्वात आधी बिबट्या आणि नंतर झाडीतून डोकावणारे सुंदर हरीण त्यांना दिसले. सिमेंट कॉक्रिंटच्या या मुंबई शहरात असे चित्र कुठे पाहायला मिळते. आपण त्यांच्या घरात घिरकावं केल्यापासून ते बिचारे बेघर झालेत. त्यामुळे असे कधीतरी कुठेतरी दिसून येतात. सिद्धार्थने संधी न सोडता त्यांचे फोटो काढले आणि सोशल मीडियावरीलशेअर केले आहेत. यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CQJBKSmn_qo/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सर्वात आधी बिबट्या दिसल्यानंतर एकही क्षण न घालवता ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आणि इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटले की, आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. “तुमच्यामुळे झालंय हे” असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.

https://www.instagram.com/p/CQJhe99JRB4/?utm_source=ig_web_copy_link

तर सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरने देखील इंस्टाग्रामवर बिबट्याचा कठड्यावर बसलेला फोटो शेअर करत लिहिले की, पाहुणा कोण? मी? की तुम्ही?? त्यानंतर काही वेळानंतर सिद्धार्थ आणि मितालीने एका सुंदर हरणाचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो हरीण झाडातून हलकेच बाहेर येत डोकावताना दिसतो आहे.

https://www.instagram.com/p/CQJalRInFlD/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थने हा फोटो शेअर करत लिहिले की, पिंजऱ्यात मी होतो. अडकलेलो. तो मोकळा फिरत होता सगळीकडे. अजून एक.. तर मितालीने हा फोटो शेअर करताना लिहिले की, आज आमच्याकडे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा! सध्या ह्या फोटोनी सोशल मीडियावर चांगलीच रंगात आणली आहे आणि हे फोटो अतिशय वायरल होत आहेत.

Leave a Comment