तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी धावला दादरचा सिद्धिविनायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिवरे (चिपळूण ) तिवरे गावात धरण फुटल्याने तिवरे गावातील भेंदवाडी येथील सर्वच घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्याच प्रमाणे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बेघर झालेल्या पुरग्रस्थांना मदतीचा हात देण्यासाठी दादर येथील सिद्धिविनायक मंदिराची प्रभादेवी न्यास समिती धावली आहे. येथील पुरग्रस्थांना प्रभादेवी न्यासाच्या वतीने घरे उभारून दिली जाणार आहेत.

प्रभादेवी न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या संदर्भात पत्रकामाहिती दिली आहे. शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी आदेश बांदेकर यांच्याकडे या संदर्भात शिफारस केली होती. त्यानंतर आदेश बांदेकर यांनी पुरग्रस्थांना मदत करण्याचा भरीव मदतीतीचा प्रस्ताव बनवून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घेताच तिवरे पुरग्रस्थांचे घरे उभारण्याचे काम सुरु केले जाईल.

२ जुलै २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटले. या आधी येथील लोकांनी धरणाला गळती लागल्याचे देखील लेखी तक्रारी द्वारे कळवले होते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि हि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिवरे गावातील २३ लोक ठार झाले आहेत. या मृत्यमुखी पडलेल्या लोकांच्या कुटूंबियांना सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र अद्याप त्यांच्यापर्यंत ती मदत नपोचल्यामुळे या लोकांच्या रोजच्या जगण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. तसेच आयुष्याची कमाई एकत्रित करून बांधलेली घरे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या लोकांच्या मदतीला सिद्धिविनाय मंदिर, प्रभादेवी न्यास धावून आल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे.

Leave a Comment