व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सिंधुदुर्गमध्ये आंबे चोरल्याच्या संशयावरून तरुणांना नग्न करून मारहाण

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोघा जणांना आंबे चोरल्याच्या (stealing mango) संशयावरून नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. हि संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-उभादांडा या ठिकाणी घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर या मारहाणीप्रकरणी आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-उभादांडा या ठिकाणी आंबे चोरल्याच्या (stealing mango) संशयावरून नग्न करून काही जणांना मारहाण करण्यात आली आहे. यानंतर या मारहाणी प्रकरणी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सात जणांवर वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हायरल व्हिडिओ एक मिनिटांचा आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये आंब्याच्या (stealing mango) चोरीवरून संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यात मारून टाकण्याचीही धमकी देण्यात येत आहे तसेच शिवीगाळ देखील करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे पण वाचा :

मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन

KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली

Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!