प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य द्या.. म्हणत गायक अरिजित सिंगने मानले मदतकर्त्यांचे आभार

Arijit Singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह याच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना ए निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याने ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली जात होती. त्यानंतर ट्विटमध्ये अरिजीतचे नाव वाचून अनेकांनी मदतीची पुहार लगावली होती. या संदर्भात अरिजीतने मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत तर सोबतच त्याच्या इतकेच इतर प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य द्यायला हवे असे त्याने म्हटले आहे.

https://twitter.com/ARIJIT__SINGH/status/1390241652300685315

अरिजीत सिंगने या पोस्टमध्ये लिहिले होते कि, .. जे या वेळी माझ्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, कृपया अरिजीत सिंग हे नाव आपल्याला दिसल्यामुळे या गोष्टी अति करु नका. जोपर्यंत आपण प्रत्येकाचा आदर करण्यास शिकत नाही, तोपर्यंत आपण या आपत्तीपासून स्वत: ला उन्नत करू शकणार नाही. माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आणि वेळी मदत करणाऱ्या लोकांचे आम्ही आभारी आहोत पण कृपया लक्षात ठेवा सर्व माणसे आहोत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य दिलेच पाहिजे.

https://www.instagram.com/p/COhvPTIFvfe/?utm_source=ig_web_copy_link

सध्या अरिजीतच्या आईची तब्येत स्थित असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप अरिजीतने याबाबत इतर कोणत्याही गोष्टीचा उल्लेख व उलघडा केलेला नाही. अरिजीतची हि पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी या पोस्टवर त्याच्या आईसाठी प्रार्थना केली आहे. तर अरिजीतला भरभरून आशीर्वाद देखील दिले आहेत. सध्या बॉलिवूड क्षेत्रात अरिजित सिंग हे नाव म्हणजे चलती गाडी आहे. एकापेक्षा एक हिट गाणी देत आज अरिजित सिंगने आपल्या वाट्याला लाखो चाहत्यांचा समुदाय जमा केला आहे.