‘खोट्या बातम्या देणं बंद करा’..! माध्यमांच्या बातमीवर गायिका सोना मोहापात्रा भडकली; ट्विटरवर केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीमूळे अनेको व्यवसाय, व्यापार आणि अगदी सिनेसृष्टी देखील ठप्प झाली आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे सामान्य जनता आर्थिक परिस्थितीला तोंड देतच आहे मात्र यांसोबत सेलिब्रेटींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अशा अनेक बातम्या रोज प्रसारित होत आहेत. अशीच काही परिस्थिती प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रावर ओढवली आहे आणि तिची परिस्थिती बिकट आहे. अश्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. मात्र तिने या बातम्या खोट्या असून आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असल्याचा मोठा खुलासा दिला आहे. इतकेच नव्हे तर या बातमीसाठी तिने माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही तासांपासून गायिका सोना मोहापात्रा आर्थिक संकटात असल्याच्या बातम्या फिरत आहेत. मात्र विशेष असे कि ह्या बातम्या खोट्या असल्याचे सोनाने स्वतःहून ट्विट करीत सांगितले आहे. प्रत्येक माध्यमांच्या न्यूजला रिट्विट करीत तिने वेगवेगळे स्पष्टीकरण देत एकच सांगण्याचा प्रयत्न केला आहे, कि तिची आर्थिक परिस्थिती काही बिकट वगैरे नसून अगदीच व्यवस्थित आहे.

एका ट्विटमध्ये तिने लिहिले, हे अतिशय चुकीचं आहे प्रिय मीडिया.. केवळ १+१ ५००० करण्यासाठी तुम्ही अन्य खोट बोलताय. चला स्पष्ट होऊ द्या- मी माझी बचत माझ्या फिल्ममध्ये लावली आहे. महामारीच्या वेळी कलाकारांनी मिळकत करणे थांबविले. परंतु मी करीत आहे, धन्यवाद. रिअल इस्टेट, विशेषाधिकार, कुटुंब इतरांनाही मदत करण्यासाठी माझे प्रयत्न करीत आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये तिने लिहिले कि, “खराब” ??? !!! हसणारा चेहरा आनंदाश्रू चेहऱ्याने आणि अश्रूंनी हसताना जमिनीवर लोळत हसताना झाला असेल. पण या ‘न्यूज पोर्टल’ चे काय आहे, एक ट्वीट निवडत त्यावरील चेरी उचलून एक वेगळीच गोष्ट बनवत आहेत !!! माझी आर्थिक स्थिती खूप ठीक आहे, धन्यवाद. अश्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या देणं थांबवा स्टॉप. खरतर हा माध्यमांचा गैरसमज सोनाच्या एका ट्विटमुळेच झाला आहे.

तिने एक ट्विट सेल्फी शेअर करत लिहिले की, ‘संकटातून पळवाट काढता येत नाही, पण दुःखी राहायचे की आनंदी हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा चित्रपट #ShutUpSona आजही सर्व जगात प्रवास करत आहे. फेस्टिव्हल जिंकत आहे. मी केलेली सर्व बचत खर्च झाली आहे. माझे जमा असलेले सर्व पैसे या चित्रपटासाठी खर्च झाले आहेत.

 

कोरोनामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली आहे कोरोनाने आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवले आहे. ज्या ठिकाणी उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही.’ नेमके हेच ट्विट पाहून सर्व माध्यमांनी तिची आर्थिक परिस्थिती बिकट असेल अशी शक्यता वर्तविता या बातम्या प्रसारित केल्या आणि सोनाचा पारा चढला.

गायिका सोना मोहापात्रा स्त्रीवादापासून सामाजिक मुद्द्यांपर्यंत सर्व मुद्द्यांवर आपले परखड आणि स्पष्ट असे मत सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अनेकदा ट्रोलर आपली मर्यादा सोडून तिला नको नको ते बोलताना दिसतात. मात्र ती या ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावत असते. त्यामुळे बऱ्याचदा ती चांगलीच चर्चेत येत असते. मागील वर्षी सोनाने म्हटले होते की, सलमान खानच्या विरोधात बोलल्यामुळे तिला गँगरेप आणि अॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. तिच्या या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडविली होती.

Leave a Comment