सिंघू बॉर्डरवर हिंसक जमावाचा शेतकऱ्यांवर हल्ला; स्थिती तणावपूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर एका जमावानं आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा असताना देखील या जमावाने शेतकऱ्यांवर दगडफेक करत तेथील तंबू उद्धस्त करण्याचा प्रयन्त केला आहे. यावेळी या जमावाने प्रक्षोभक नारेबाजी केली.

दरम्यान, या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी या जमावावर नियंत्रण मिळवले असले तरी स्थिती तणावपूर्ण बनली आहे.

स्वतःला स्थानिक नागरिक सांगत या जमावाने प्रक्षोभक घोषणा देत शेतकऱ्यांना आंदोलन स्थळ खाली करा म्हटलं आहे. यावेळी शेतकरी नेत्यांकडून आंदोलक शेतकऱ्यांना शांती ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिंसक झालेल्या जमावाच्या दगडफेकीत काही पोलीस आणि शेतकरी जखमी झाले आहेत. वातावरण तणावपूर्ण असून पोलीस आंदोलनस्थळ खाली करण्यास सांगत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1355069771289481217?s=20

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment