हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 2018 पासून प्लॅस्टीकच्या वस्तूंवरील राज्यव्यापी बंदी अंशतः उठवली आहे. याअंतर्गत राज्य सरकारने स्ट्रॉ, प्लेट्स, कप, ग्लास, काटे वाले चमचे आणि कंटेनर यासारख्या एकदाच वापरता येणाऱ्या डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास परवानगी दिली आहे .
महाराष्ट्र पर्यावरण विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. यासोबतच सरकारने न विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन कॅरी-बॅगलाही परवानगी दिली आहे. जे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीसह 60 ग्रॅम प्रति चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्र शासनाने अशा प्लास्टिक वस्तूंच्या वापरास, साठवणूक करण्यास आणि , विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
प्लास्टिक बंदीमुळे राज्यातील अनेक छोटे मोठे कामगार, युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि लघु उद्योजकांच्या संघटनांकडून प्लास्टिक बंदी उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी पर्यावरण विभागासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला.