महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या बहिण- भावाला थापा पाॅंईटवर लुटले

Pasarani Ghat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पाचगणी मुख्य मार्गावर पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण – भावंडांना मोटार सायकल वरून आलेल्या चाैघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत लुटमार केल्याची घटना घडली. पसरणी घाटातील थापा पॉईंटच्या वरील बाजूस पाठीमागून आलेल्या स्पेल्डर आणि पल्सर मोटरसायकल वरील अंदाजे वय 25 ते 30 वर्षे वयोगटातील अज्ञात चार इसमांनी मारहणा केली. याबाबतची फिर्याद शुभम दत्तात्रय वांगडे (वय- 23, मु. पिंपरी पो. कुसुंबी, ता. जावळी) यांनी पाचगणी पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर येथे कार मधून फिरण्यासाठी जाताना कारमध्ये बसलेल्या शुभम दत्तात्रय वांगडे (पिंपरी पोस्ट कुसुंबी, ता. जावळी) व बहिणी सुप्रिया लक्ष्मण वाघ, नीलम लक्ष्मण वाघ, (दोघेही रा. मेढा) वाईवरून पाचगणीच्या दिशेने निघालेले होते. या दरम्यान, पसरणी घाटातील थापा पॉईंटच्या वरील बाजूस पाठीमागून स्पेल्डर आणि पल्सर मोटरसायकल वरील अज्ञात चार युवकांनी दुचाकी आडवी लावून आमची चप्पल तुटली आहे. तुला वाहन नीट चालवता येत नाही, असे म्हणत शुभमला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी शुभम सोबत असलेली बहीण सुप्रिया हिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने चोरून घेऊन पळून गेले. संबंधित घाटामध्ये वाट मारी करण्याच्या हेतूने दबा धरून बसणाऱ्या दरोडेखोरांवर पाचगणी पोलीस स्थानकामध्ये 394, 341, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार करत आहेत.