धुळे प्रतिनिधी। शहापूर विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कृष्णा भवर यांच्या प्रचारार्थ मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मा. खासदार सिताराम येचुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहापूर विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहापूर तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सिताराम येचुरी यांनी यावेळी युती सरकारवर टीका केली. हे सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्याचं आहे. आधीचा नारा जय हिंदचा होता आता, मोदी सरकार मात्र जिओ हिंद चा नारा देत असल्याचं येचुरी म्हणाले.
मोदी सरकार वन कायद्याचे उल्लंघन करत असून या कायद्याला बनवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठा लढा दिला आहे. कष्टकऱ्यांची वनजमीन घेण्याचा प्रयत्न सरकार करत असून शहापूर वाडा व मोखाडा तालुक्यातील ७२ महसुली गावांना याचा फटका बसणार असल्याची धक्कादायक माहिती येचुरी यांनी माध्यमांना दिली.
इतर काही बातम्या-
जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस
वाचा सविस्तर – https://t.co/CAybwoqgqI@Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @ChDadaPatil #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
वंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर
वाचा सविस्तर – https://t.co/bDspD0y9Ou@BJP4India @Prksh_Ambedkar #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा
वाचा सविस्तर – https://t.co/vwyhLOeNl4@BJP4India @BJP4Maharashtra #electricity #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019