सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 196 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 110 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 16 हजार 577 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 75 हजार 786 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 55 हजार 258 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 864 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 36 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या 16 दिवसांपासून कडक लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमधून काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे बंद असलेली दुकाने सुरू करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु जरी निर्बंध हटविले असले तरी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.