हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका बंद पडलेल्या घरात तब्बल 5 मृतदेहांचे सांगाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथील आहे. हे सर्वच्या सर्व 5 मृतदेह एकाच कुटुंबातील लोकांचे असल्याची शक्यता आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती समोर आलेली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
अर्धवट उघडलेल्या घराच्या दारात एक कवटी काही जणांना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस सदर घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी आणि आसपासच्या लोकांशी चर्चा केली असता त्या कुटुंबातील लोक हे अनेक वर्षांपासून एकाकी जीवन जगत होते, कोणाशी मिसळत नव्हते तसेच गंभीर आजारांचा सामना संपूर्ण कुटुंब करत होते अशी माहिती पोलिसाना मिळाली. यापूर्वी 2019 मध्ये त्या कुटुंबाला आसपासच्या लोकांनी शेवटचं बघितलं होते. परंतु घराला कुलूप असल्याने त्यावेळी कोणीही पोलीस तक्रार वगैरे केली नव्हती.
आज पोलिसांनी थेट घरात जाऊन बघितलं असता आतमध्ये काही तोडफोड झाल्याचे दिसले. एका खोलीत चार मृतदेह आढळले तर दुसऱ्या खोलीत महिलेचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून नमुने घेतले. तसेच इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम आणि सीन ऑफ क्राइम ऑफिसर्स (एसओसीओ) यांना बोलावून पाचारण करण्यात आलं आहे. याशिवाय तपासा दरम्यान, घराच्या आसपास कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधार सदर मृतकांची ओळख जगन्नाथ रेड्डी, त्रिवेदी जगन्नाथ रेड्डी, कृष्णा रेड्डी , नरेंद्र रेड्डी, प्रेमा रेड्डी अशी केली आहे. परंतु पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच मृतांची अचूक ओळख पटेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.