Skin Care | हिवाळा सुरू झालेला आहे. हा हिवाळा अनेक लोकांना आवडतो. पण हिवाळ्यासोबत त्वचेचे आणि आरोग्याचे अनेक आजार उद्भवतात. खास करून त्वचेच्या बाबत अनेक समस्या निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा अत्यंत कोरडे पडते. आणि बारीक सुरकुत्या यायला लागतात. तसंच आपली त्वचा उकलायला लागते. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा पुढे जाऊन संपूर्ण त्वचेची आग होते.
अनेक वेळा काही लोकांची त्वचा एवढी कोरडी पडते की, त्याला खाज सुटते आणि तडे देखील जायला सुरुवात होतात. आणि हळूहळू संपूर्ण भाग कोरडा पडून तिथली त्वचा काळी पडू लागते. अशावेळी तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी बॉडीला मॉइश्चरायजर किंवा बॉडी लोशन लावणे खूप गरजेचे असते. किंवा तुम्ही त्वचेवर तेल देखील लावू शकतात. तेलाने देखील तुमची त्वचा मऊसर राहते.
ज्यावेळी शरीरातील आद्रता कमी होते. त्यावेळी त्वचेच्या कोरडी पडायला लागते. अनेकदा ही त्वचा इतकी कोरडी पडते की. सगळीकडे खाज सुटते. अनेक वेळा त्वचा प्रमाणापेक्षा जास्त कोरडी पडल्याने कोड ही येतात. अशावेळी तुम्ही घरगुती उपचार करणे खूप गरजेचे असते. थंडीत तुम्ही त्वचेचे रक्षण केले पाहिजे. यासाठी खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकता. तुम्ही खोबरेल तेलामध्ये काही पदार्थ मिक्स करून जर तुमच्या त्वचेवर टाकले तर त्वचेवरील कोरडेपणा दूर होईल.
खोबरेल तेल आणि ग्लिसरीन | Skin Care
हिवाळ्यात जर सारखी तुमची त्वचा कोरडी पडत असेल, तर तुम्ही खोबरेल तेल सोबत ग्लिसरीन वापरू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. खोबरेल तेलसोबत ग्लिसरीन वापरणे हा ड्राय स्किनसाठी चांगला पर्याय आहे. यामुळे त्वचेतील आद्रता भरून निघते. आणि कोरडेपणा कमी होतो. तसेच खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असणारे विटामिन्स आणि मिनरल असतात. जे त्वचेला पोषण देतात. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये खोबरेल तेल आणि ग्लिसरीन सारख्या प्रमाणात घ्या. ते मिश्रण एकत्र करून त्वचेला मालिश करून घ्या. तुम्ही रात्रभर देखील तसेच ठेवू शकता आणि सकाळी उठून धुवू शकता.
खोबरेल तेल आणि कॉफी पावडर
थंडीमध्ये त्वचा जास्त कोरडी पडते. अशावेळी त्वचेचे एक्सपोलेशन करणे गरजेचे असते. यासाठी त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात एका बाऊलमध्ये कॉफी पावडर टाकून मिक्स करा. हे एकत्र मिश्रण करा आणि त्वचेवर लावून मसाज करा दहा ते पंधरा मिनिट तुम्ही हा मसाज करा. आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.
खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल
त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात एलोवेरा जेल मिक्स करून देखील लावू शकता. एलोवेरा जेल आणि तेलामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. आणि आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. एलोवेरा जेलमध्ये विटामिन असते. त्यामुळे तुमच्या त्वचेतील कोरडेपणा दूर होईल. आणि त्वचा अत्यंत मुलायम आणि सुंदर होईल.