हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतात फोर व्हीलर कारची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्या प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. याच कंपन्यांपैकी एक असणाऱ्या स्कोडा कंपनीने Octavia RS iV हि कार तयार केली आहे. स्कोडा कंपनी ही गाडी 2023 वर्षाच्या शेवटी लाँच करणार आहे. हि कंपनी 2023 च्या शेवटी भारतातील आपले पहिले plug in hybrid Octavia RS iV गाडी लाँच करणार आहे. हे मॉडेल Octavia RS iV चे चौथे जनरेशन असणार आहे.
Skoda Octavia RS iV चे फिचर्स
Skoda Octavia RS iV या मॉडेलमध्ये मागील RS मॉडेल्ससारखीच भरपूर फीचर्स देण्यात आलेली आहेत. बाहेरील बाजूला black grille(ब्लॅक ग्रील), sharp fog lamp housings(शार्प फॉग लॅम्प हाऊसिंग्स ), black finish air inlets(ब्लॅक फिनिश एअर इन्लेट्स ) and sportier bumpers (स्पोर्टीयर बंपर्स) असे फिचर्स या मध्ये देण्यात आले आहेत.
गाडीच्या इंटेरिअरमध्ये , स्किडप्लेट्सवर ग्लॉसी फिशिंग करण्यात आले आहे. तसेच टेक्नॉलॉजी मध्ये 10 इंची टचस्क्रीन एलईडी स्क्रीन देण्यात आला आहे. या मॉडेलचे इंजिन 1.4-लिटर चार-सिलेंडर TSI चे आहे. यामध्ये 150 hp चे output असून जर ते 116 hp क्षमता असणाऱ्या इलेट्रीक मोटर्सही याला जोडले तर यातून निघणारे output हे 245 hp इतके असणार आहे. Skoda Octavia RS iV 7.3 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग वाढविण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या गाडीची किंमत साधारणपणे 45 ते 50 लाख इतकी असणार आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय