लोकसभेची लगीन घाई ; मतदारांना मिळणार फोटो असणाऱ्या स्लीप

0
52
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश पाटील 

लोकसभा निवडणुकीची घटिका समीप येत असताना प्रशासनाची सर्व पातळ्यांवर लगीनघाई सुरू आहे. लगीनकार्यात घरोघरी अक्षता वाटपाचे काम जितके महत्त्वाचे असते तितकीच महत्त्वाची अशी स्लीपवाटपाची प्रक्रिया सध्या गतीने राबवली जात आहे.

जिल्ह्यात ८० टक्के मतदारांचे फोटो असलेल्या स्लिपचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून वाटप झाले आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदार संख्या निश्चित झाली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाच्या फोटोसह असलेल्या स्लिपांचे वाटप सुरू आहे.

ग्रामीण भागात हे काम अधिक गतीने सुरू आहे. तथापि, शहरात काही प्रमाणात अडथळे येत आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच प्रयोग राबवण्यात आला होता. तेव्हापासून प्रत्येक निवडणूकीला स्लिपा प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. स्लीप असली तरीही एक ओळखीच्या पुराव्याची गरज आहे. मिरज विधानसभेत ३ लाख २४ हजार १७८, सांगलीत ३ लाख २० हजार ७९०, पलूस-कडेगावमध्ये २ लाख ७५ हजार २४७, खानापुरात ३ लाख २१ हजार १०७, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये २ लाख ९२ हजार १४४ व जतमध्ये २ लाख ६९ हजार ५८८ मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here