हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस ही आधुनिक भारताचे प्रतीक आहे. वंदे भारतच्या माध्यमातून भारतीयांचा प्रवास अतिशय सुखकर होत असून सरकार सुद्धा सातत्याने प्रत्येक राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर रेल्वे बद्दल (Sleeper Vande Bharat Express) चर्चा रंगत होती. ह्या स्लीपर रेल्वे लूकबद्दल असलेली उत्सुकता सर्वांनाच आहे. आता त्याच उत्सुकतेला पूर्णविराम लागला आहे. कारण वंदे भारतच्या स्लीपरचा पहिला लुक समोर आला आहे. कसा आहे हा लूक जाणून घेऊयात.
कशी दिसतेय वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार – Sleeper Vande Bharat Express
एखाद्या लग्झरीयस हॉटेल प्रमाणे ही स्लीपर रेल्वे भासत आहे. सोशल मीडियावर ह्या ट्रेनच्या आतील भागाचे फोटोज व्हायरल होताना दिसून येत आहेत. त्यातून समजून येत आहे की अत्यंत सुविधापूर्वक ही ट्रेन प्रवाश्यांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामध्ये तुम्हाला अधिक मोकळी जागा देखील उपलब्ध असणार आहे. जेणेकरून तुम्ही आरामशीर ह्या प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. देशात एकूण 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर व्हर्जनमध्ये 857 बर्थ असतील, त्यापैकी ८२३ बर्थ प्रवाशांसाठी आणि ३४ कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. सर्व गाड्यांमध्ये पँट्रीची सुविधाही असेल.
कोणासाठी असेल ही ट्रेन?
जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर आणि तुम्ही स्लीपर कोचसाठी तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी वंदे भारत ही रेल्वे उत्तम पर्याय असणार आहे. आतापर्यंत वंदे भारतमध्ये चेअर कारची व्यवस्था उपलब्ध होती. त्यामुळे ह्या गाडीचा प्रवास हा काही ठिकाणापुरताच मर्यादित होता. मात्र ही ट्रेन सर्वदूरपर्यंत पोहचवण्यासाठी तिचे रूपांतर स्लीपर कोचमध्ये करण्यात आले आहे.
काय असतील सुविधा?
ह्या ट्रेनमध्ये Sleeper (Vande Bharat Express) तुम्हाला प्रत्येक कोचमध्ये स्वतंत्र पॅन्ट्री असेल. जिथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. पॅसेंजर डब्यातच पॅन्ट्री बनवल्यामुळे आता ट्रेनमध्ये चार ऐवजी एकूण तीन टॉयलेट असणार आहेत. तसेच ट्रेनचा लूक हा एखाद्या हॉटेल रूम प्रमाणे दिसत आहे.
2024 मध्ये धावेल रेल्वे रुळावर
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही येत्या वर्षात म्हणजेच मार्च 2024 ला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बिना सीच्या प्रवाश्यांसाठी ही ट्रेन 31 ऑक्टोबरलाच सुरु केली जाईल. असे इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते. वंदे भारत स्लीपर ट्रेन सोबतच ICF वंदे मेट्रो देखील विकसित केली जात आहे. वंदे मेट्रो ही एकूण 12 डब्यांची ट्रेन असणार आहे. जी कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरली जाईल.