मुंबई । आज भारतीय शेअर बाजारामध्ये (Stock Markets) देखील किरकोळ घसरण नोंदली गेली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आज लाल निशाण्यावर बंद झाले. बीएसईचा सेन्सेटिव्ह निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) बुधवारी 0.04 टक्क्यांनी किंवा 19.69 अंकांनी घसरून 51,309.39 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE चा निफ्टी (Nifty) फक्त 2.80 अंक म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरला आणि 15,106.50 अंकांवर बंद झाला. तथापि, निफ्टी आयटी (Nifty IT) 0.41 टक्क्यांनी किंवा 106.10 अंकांनी वाढून 25,885.30 अंकांवर बंद झाला.
निफ्टी बँकेने (Nifty Bank) मंगळवारी वाढ नोंदविली होती परंतु आज 0.76 टक्क्यांनी म्हणजेच 273.40 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी ऑटो 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 103.30 अंकांच्या वाढीसह 11010.90 च्या पातळीवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅपमध्ये आज 0.42 टक्क्यांनी वाढ म्हणजेच 81.30 अंकांची नोंद झाली आणि ती 19420.07 च्या पातळीवर बंद झाली. या व्यतिरिक्त बीएसई मिडकॅपने 140.22 अंकांची म्हणजेच 0.71 टक्के वाढ नोंदविली. दुसऱ्या शब्दांत, आज, बँकिंग शेअर्स वगळता सर्व शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी उडी
आज बीएसई सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) टॉप गेनर (Top Gainers) ठरला. कंपनीचा स्टॉक 2.88 टक्क्यांनी वधारला. याशिवाय सिप्ला (Cipla) , एसबीआय लाइफ इन्शुरन्स (SBI Life Insurance), एम अँड एम (M&M) आणि एचडीएफसी लाइफ (HDFC Life) च्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदली गेली
आज एचडीएफसी बँक (HDFC Bank) 1.87 टक्क्यांनी घसरून बीएसई सेन्सेक्समध्ये टॉप लूजर (Top Looser) राहिला. याशिवाय आयशर मोटर्स (Eicher Motors), भारती एअरटेल, (Bharti Airtel), टाटा स्टील (Tata Steel) आणि ब्रिटानिया (Britannia) या कंपन्यांचा टॉप लूजर्स मध्ये समावेश आहे. या सर्व शेअर्समध्ये 1 टक्क्यांहून अधिकची घट नोंदविण्यात आली. भारत व्यतिरिक्त शांघाय, जपान आणि हाँगकाँगच्या बाजारपेठा आशियाई बाजारात हिरव्या चिन्हावर बंद राहिल्या. त्याचबरोबर, आज युरोपियन बाजारातही संमिश्र कल दिसून आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”