हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Saving Schemes : केंद्र सरकारने 8 बचत योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ करून सर्वसामान्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली आहे. शुक्रवारी सरकारकडून सर्व लहान बचत ठेव योजनांवरील व्याजदरात 1.1 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता 1 जानेवारीपासून ही व्याज दरवाढ लागू केली जाणार आहे. मात्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि ‘सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
आता 1 जानेवारीपासून नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. त्यावर सध्या 6.8 टक्के व्याज दर मिळतो आहे. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या 7.6 टक्क्यांऐवजी 8 टक्के व्याज दर मिळेल. तसेच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेवरील एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या व्याजदरात 1.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासोबतच मासिक उत्पन्न योजनेमध्ये आता 6.7 टक्क्यांऐवजी 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. Small Saving Schemes
पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजदरात कोणताही बदल नाही
हे लक्षात घ्या कि, सरकारने पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये खातेधारकांना आधी इतकेच म्हणजे 4% वार्षिक दराने व्याज मिळेल. मात्र, 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या टाईम डिपॉझिट योजनांच्या व्याजदरात 1.10% वाढ झाली आहे. Small Saving Schemes
खरेतर, RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्व सरकारी बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनांच्या पदरी खातेदारांची निराशा आली आहे. PPF वर सध्या 7.1 टक्के व्याज दर दिला जातो आहे. सध्या अनेक बँका पीपीएफच्या तुलनेत फिक्स्ड डिपॉझिट योजनांवर जास्त व्याज देत आहेत.
सप्टेंबर 2018 मध्ये, PPF वर 7.4% व्याजदर दिला जात होता. जून 2019 मध्ये त्यामध्ये 8% पर्यंत वाढ झाली. मात्र तेव्हापासून यामध्ये घसरण होऊन आता 7.1% व्याज दर झाला आहे. हे लक्षात घ्या कि,केंद्र सरकारकडून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याज दरामध्ये दर तिमाही आधारावर सुधारणा केली जाते . ज्याअंतर्गत सर्व 8 लहान बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. Small Saving Schemes
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा
Samsung Galaxy F04 : सॅमसंग भारतात लॉन्च करणार 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन