औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्मार्ट शहर बस सेवेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 23 जानेवारी म्हणजेच उद्यापासून शहर बससेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यावेळी अनुभवी माजी सैनिक चालक आणि वाहक ह्यांचाद्वारे सेवेचा संचालन होईल. स्मार्ट शहर बस ही ए. एस. सी. डी. सी. एल. औरंगाबाद आणि रा. प. महामंडळात झालेल्या करारानुसार रा. प. महामंडळाच्या चालक आणि वाहक यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे. पण मागील 77 दिवसांपासून चालक आणि वाहक कामावर हजर नसल्यामुळे स्मार्ट शहर बस वाहतूक बंद आहे.
नागरिकांना बस सेवेचा लाभ व्हावा म्हणून स्मार्ट शहर बस सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आबे. या निर्णयानुसार करार पध्दतीने माजी सैनिकांच्या 15 वर्षांच्या चालकांचा अनुभव बघता त्यांची नेमणूक चालक आणि वाहक म्हणून करण्यात येत आहे आणि त्यामुळे 11 बसेस दोन पाळीत बससेवा पुरवणार आहे. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, या निर्णयामुळे नागरिकांना देशसेवेचा गौरव प्राप्त असलेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. येत्या काळात या सेवेचा विस्तार कसा होईल यावर कार्य सुरू आहे, असेही ते म्हणाले. मागच्या काही महिन्यात शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उप व्यवस्थापक मुकुल देव आणि सिध्दार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली या 56 चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले.
पहिल्या टप्प्यात खालील मार्गांवर धावणार बस –
– मार्ग क्र. 4
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे – टीव्ही सेंटर
– मार्ग क्र. 5
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक
– मार्ग क्र. 12
सिडको ते घाणेगाव
मार्गे – रांजणगाव, मायलन
– मार्ग क्र. 13
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे – रांजणगाव
– मार्ग क्र. 19
चिकलठाणा ते रांजणगाव
मार्गे – सिडको, महावीर चौक, मोरे चौक