कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एकमेकांची उणी- धुणी काढण्यापासून वैयक्तिक विषय काढण्यापर्यत कराडच्या नगरपालिकेत पदाधिकाऱ्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. सभागृहात सूचना वाचण्यावरून सत्ताधारी जनशक्ती आघाडीच्या व भाजपाच्या नगरसेवकांच्यात एकमेकांच्यावर जवळपास अर्धातास आरोपाच्या फैरी झाडल्या. तर १५२, १५४ कलम व केसेस यावरही जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. त्यामुळे कराड नगरपालिकेची सभा ही वादळी ठरली.
नगराध्याक्षा रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी सभागृहात तीन नंबरची सूचना मांडताना जनशक्तीच्या नगरसेवकांनी सूचना मांडण्याची जी परंपरा आहे. त्याप्रमाणे काम चालावे, अशी मागणी केली. यावेळी तुम्ही सूचना वाचल्या त्यावेळी आम्ही पाठिंबा दिल्याची आठवण भाजपच्या नगरसेवकांनी सांगितली. तेव्हा यावर पीठासन अधिकाऱ्यांनी अधिकारांचा वापर करून निर्णय घ्यावा. आम्ही सूचक- अनुमोदन देतो. पीठासन अधिकाऱ्यांनी अधिकार घ्यावेत अशी मागणी नगरसेवक फारूख पटवेगार यांनी केली. त्यावर नगरसेवक विजय वाटेगांवकर म्हणाले, सूचना प्रशासन वाचणार असेल तर नगरसेवकांचे काय काम आहे. आम्ही सूचना वाचायला सक्षम आहे. प्रशासन सूचना वाचून तुम्ही सूचक – अनुमोदन देणार असेल तर तुम्ही पाचजण सभागृहात बसा, आम्ही बाहेर जातो.
नगरसेवक राजेंद्रसिंह यादव म्हणाले, आम्हांला अनेक विषय समजले पाहिजेत, त्यावर आम्हांला आमचे म्हणणे मांडता आले पाहिजे. कारण १०६ विषयाचे १४६, १५२ विषय कसे आले. या सूचना पत्रिकेत १० ते १२ सूचना चुकीच्या आहेत, त्यावर आम्हांला चर्चा करायचा आहेत. अभ्यास केल्याशिवाय काही बोलणार नाही. तेव्हा जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, एकमेकांबद्दल आकस ठेवला जात आहे. १५२, १५४ खाली केसेस करू नका. नगराध्यक्षाच्या आदेश असेल तर प्रशासनाने सूचना वाचाव्यात. चारची मिंटीग एवढी उशिरा का? मी काही गोष्टी काढू का? , असे म्हणाताच नगरसेवक राजेंद्रसिंह यादव म्हणाले, माझ्याकडे तुमचा सातबाराच काय आठ अ आणि सगळेच उतारे माझ्याकडे आहेत.
स्मिता हुलवान आणि विनायक पावसकर यांच्यात खडाजंगी
नगरसेविका स्मिता हुलवान आणि जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यात चांगलीच कायद्याची भाषा करत चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी त्या म्हणाल्या, १५२, १५४ काय अजून कुठली कलम असली तर तीही घालणार. तुम्ही काय सभागृहात काय बोलता आहात. तुम्ही वैयक्तिक कशाला बोलायचं. मी पुढे पाऊले उचलू शकता. पूर्णपणे चूकीचे बोलत असता.
जयवंतराव पाटीलांचे हास्याचे कारण काय?
सभा तहकूब करून तारीख घेण्याची मागणी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केली. सभागृहात चाललेल्या वादावर उपनगराध्यक्षांनी मौन धरले होते. मात्र चाललेल्या खडाजंगीचा भाग न होता, केवळ गालातल्या गालात हासत होते. त्याचे कारण मात्र काही कळाले नाही.
सर्वच विषय योग्य, कुणाच्या घरातील नाहीत- नगराध्यांक्षा
सभेत सूचना वाचण्याबरोबर योग्य विषयच वाचावेत, वादाचे विषय नको अशी मागणी जनशक्ती केली. तेव्हा नगराध्यक्षा रोहीणी शिंदे म्हणाल्या, सर्वच विषय शहराच्या हिताचे आहेत. कामे होणारी आहेत. सभागृहात कोणी घरातील विषय घेवून आलेले नाही.