आर आर पाटीलांना मृत्यु अधीच दिसला होता का? शेवटच्या त्या दिवशी नक्की काय घडले?

0
74
R R Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे लोकप्रिय नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या निधनाला आज आठ वर्ष पूर्ण झाली. आबांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ? असा सवाल स्मिता यांनी केला आहे. आबांच्या त्या शेवटच्या दिवशी नक्की काय घडलं हे स्मिता यांनी या पोस्ट मधून सांगितले आहे. खालील स्मिता पाटील यांची संपूर्ण पोस्ट देत आहोत.

पप्पाचा शेवटचा दिवस !
आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले.
काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.
3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.
6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधुन सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले.घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांन कडे बघुन जात असत.पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधुन वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणी ना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते.
आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पाना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व प्पपा च्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पा नी आम्हाला शेवट चे खुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.
स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणख किती सत्कार करणार .. ?
मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ?

https://www.facebook.com/Smita-R-R-Patil-351437568391094

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here