स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

smita thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांचा बंड झाल्यापासून आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ठाकरे आणि त्यांच्यातला संवाद हा तुटला आहे. त्यातच आता ठाकरे घराण्यातल्या पहिल्या व्यक्तीने (smita thackeray) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्मिता ठाकरे (smita thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहेत स्मिता ठाकरे?
स्मिता ठाकरे (smita thackeray) या बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. तसेच काही चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे. त्यांचं व्यावसायिक करिअर हे चित्रपटांशी निगडित राहिलेलं आहे. मात्र आता त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

स्मिता ठाकरे यांची प्रतिक्रिया ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृही झालेल्या या भेटीनंतर त्यांची (smita thackeray) पहिली प्रतिक्रिया आली आहे. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. आज एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत. त्याचा आदर मी करते. त्यांचं कामही मला माहिती आहे. त्यांनी शिवसेनेत खूप काम केलं आहे. मी (smita thackeray) त्यांना खूप आदराने बघते. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी कुटुंब वगैरे काही पाहिलं नाही, एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!