हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शानेल इराणी अर्जुन भल्लासोबत विवाहबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील 500 वर्ष जुन्या ऐतिहासिक खिमसर किल्ल्यात हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण किल्ला सजवण्यात आला होता.
या लग्न समारंभासाठी कुटुंब आणि जवळची अशी फक्त ७० लोक उपस्थित होती. शानेल आणि अर्जुनच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. निमंत्रित पाहुण्यांव्यतिरिक्त गडावर कोणालाही येण्यास पूर्ण बंदी होती. 2021 मध्येच शानेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांचा साखरपुडा पार पडला होता.
बुधवार आणि गुरुवार अशा २ दिवसांच्या या लग्नासाठी शानेल आणि तिचे वडील झुबिन इराणी मंगळवारीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते तर स्मृती इराणी संसदेच्या अधिवेशनामुळे बुधवारी सकाळी जोधपूरला पोहोचल्या.
स्मृती इराणी आपल्या मुलीच्या लग्नात खूप आनंदी दिसत होत्या. यावेळी त्यांनी डान्स सुद्धा केला. शानेल इराणी ही स्मृती इराणी यांचे पती झुबिन आणि त्यांची पहिली पत्नी मोनी इराणी यांची मुलगी आहे. शानेल पेशाने वकील आहे, तर स्मृती इराणी यांचा जावई अर्जुन भल्ला हा एनआरआय आहे. तो कॅनडामध्ये राहतो.
शानेल आणि अर्जुनच्या लग्न समारंभात स्मृती इराणीने शंख फुंकला. अर्जुन भल्लाचे पांढऱ्या घोड्यावरून आगमन होताच गडावरूनच ढोल-ताशांच्या गजरात त्यांची खास मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी उशिरापर्यंत विवाह सोहळ्यातील फोटोशूटचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर वधू-वरांसह पाहुण्यांनी एकत्र शाही जेवण केले.