सूर्यावर दिसला फिरता साप; VIDEO पाहून शास्त्रज्ञसुद्धा झाले थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पृथ्वीपासून सूर्य (Sun) कितीतरी अंतर लांब आहे. तरीदेखील सूर्याच्या (Sun) उष्णतेचे चटके पृथ्वीवर बसतात. त्यामुळे सूर्याचा गोळा किती तप्त असेल याची कल्पना सगळ्यांना येईल. त्यामुळे सूर्यावर (Sun) एखादा जीव काय सूर्याच्या आसपासही कुणी राहू शकत नाही. मात्र सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे सगळेच शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. सूर्यावर चक्क एक साप दिसला आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटरने सूर्याचा (Sun) हा व्हिडीओ बनवला आहे. ज्यात सूर्याच्या पृष्ठभागावर एक साप पळताना दिसला. हा व्हिडीओ पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. ESA च्या शास्त्रज्ञांनी याला सर्पेंट इनसाइड सन असं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. त्यामुळे सूर्यासारख्या (Sun) आगीच्या गोळ्यात जिथं कोणताच जीव टिकू शकत नाही, अशा ठिकाणी खरंच साप आहे का? सापासारखी दिसणारी ही आकृती नेमकी काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

5 सप्टेंबर 2022 रोजी सोलर ऑर्बिटरने हे दृश्य टिपलं आहे. खरं तर सूर्यात (Sun) दिसलेला हा साप म्हणजे खरा साप नव्हे तर सौर लहर आहे. एका मोठ्या सौर विस्फोटहून निघणारी सौर लहर आहे. जी सापासारखी चालताना दिसत आहे. सूर्यामध्ये अशा सौर लहरी येत असतात. या लहरींना पेरिहेलियॉन असे म्हंटले आहे. सापाच्या आकाराची ही लहर दुर्मिळ पाहायला मिळते.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..